Vivek Patil Arrested: मोठी बातमी! शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
Enforcement Directorate | (File Photo)

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil) यांना ईडीने (ED) अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. कर्नाळा सहकारी बॅंकेचे (Karnala Nagari Sahakari Bank) गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या कारवाई दरम्यान पाटील यांच्या घराचीही झाडाझडती ईडीने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

कर्नाळा बँकेत कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आले होते. त्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. यामुळे ठेवीदार आणि बॅंक खातेदारांचे पैसे पर मिळावे, यासाठी पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते. तसेच गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. पण यात खूप मोठे मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला होता. हे देखील वाचा- महिलांवर होणारे हल्ले आणि त्यातील त्यांच्या मृत्यूची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

ट्वीट-

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली आहे. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या 2 वर्षांपासून होती. शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने त्यांना वाचवले जात होते, असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येत होता.