Atal Setu To Remain Closed: मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) म्हणजेच अटल सेतू (Atal Setu) शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तास बंद राहणार आहे. अटल सेतूवर रविवारी सकाळी भव्य L&T सी ब्रिज मॅरेथॉन 2024 (L&T Sea Bridge Marathon 2024) होणार आहे. लार्सन अँड टुब्रोने एमएमआरडीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमुळे अटल सेतू शिवडी-न्हावा शेवा सी लिंकवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्यामुळे, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11:00 वाजेपासून ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00 वाजेपर्यंत प्रवासासाठी सागरी पूल बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. परिणामी सर्व प्रकारच्या वाहनांना सी लिंकवर जाण्यास बंदी असेल. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
तथापी, पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहने या वाहतूक नियंत्रण सूचनांमधून तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी वाहनांना अटल सेतूवर सूट देण्यात आली आहे. (हेही वाचा - First Public Bus Service On Atal Setu: अटल सेतूवर सुरु होणार पहिली सार्वजनिक बस सेवा; BEST ने निश्चित केला मार्ग, जाणून घ्या सविस्तर)
हा असेल पर्यायी मार्ग -
18 फेब्रुवारी रोजी सकाळी 4:00 ते दुपारी 12:00 या वेळेत होणाऱ्या मॅरेथॉन दरम्यान 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11:00 ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00 वाजेपर्यंत सी लिंकवर वाहनांच्या प्रवेशास बंदी असेल. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उरण ते अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांना इच्छित स्थळी जाण्यासाठी गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे पर्यायी मार्ग असतील. (हेही वाचा - Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch))
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने (मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग) जलद मार्गाने निर्देशित केले जाईल. त्यांना बेलापूर आणि वाशी मार्ग वापरून इच्छित स्थळी पोहोचावे लागेल. तथापी, जेएनपीटीहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबईतील त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी गव्हाण फाटा आणि वाशी खाडी पूल मार्गे पुनर्निर्देशित केली जातील. (हेही वाचा -Mumbai Atal Setu: 'लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या 'अटल सेतू’वर थांबून फोटो काढणे बेकायदेशीर'; Mumbai Traffic Police यांनी केले नागरिकांना आवाहन)
एल अँड टी सी ब्रिज मॅरेथॉन -
एल अँड टी सी ब्रिज मॅरेथॉन 2024 ची उद्घाटन रन 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. जवळपास 5,000 उत्सुक धावपटू, बहुसंख्य मुंबईतील रहिवाशांनी या मेगा इव्हेंटसाठी आधीच नोंदणी केली आहे. सहभागींना चार शर्यती प्रकारांमधून निवड करण्याची संधी आहे, ज्यामध्ये सकाळी 5 वाजता 42 किलोमीटर स्पर्धा सुरू होईल, त्यानंतर सकाळी 6 वाजता हाफ मॅरेथॉन, 6.30 वाजता 10 किलोमीटर धावणे आणि सकाळी 6.45 वाजता 5 किलोमीटर धावणे सह समाप्त होईल.