Bhushi Dam Overflow: मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हर फ्लो, पर्यटकांची मोठी गर्दी (Watch Video)
Photo Credit - X

Bhushi Dam Overflow: पुण्यात सध्या जोरदार पावसाचा धुमाकुळ पहायला मिळत आहे. त्यामुळे लोणावळ्यामधला प्रसिद्ध (Lonavala) असलेला भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. तिथे पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. पुणे आणि मुंबईवरून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना भुशी डॅम (Bhushi Dam) हा नेहमीच भुरळ पाडत आसतो. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुशी डॅम आज ओव्हर फ्लो झाला आहे. पर्यटक मागील महिनाभरापासून भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची आतुरतेने वाट पहात होते. अखेर आज तो क्षण आला. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि रविवारी सकाळपासून झालेला पावसामुळे भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. (हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!)

व्हिडीओ पहा

भुशी डॅमच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे आज लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना प्रचंड आनंद झाला आहे. मोठ्यासंख्येने पर्यटकांनी भुशी डॅमवर गर्दी केली आहे. भुशी धरणावरील वर्षाविहार हा पर्यटकांचा आनंदाचा आणि आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे स्थानिक नागरीक आणि पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पहात होते. भुशी डॅमवर येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना या काळात पैसे कमावण्याची संधी असते.