![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/04/MicrosoftTeams-image-22-380x214.jpg)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल ठाकरे यांनी बहुमोल सूचना केल्या. या वेळी मनसेचे आमदार राजू (प्रमोद) पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसेत नाराजी, अनेक कार्यकर्त्यांचे पक्षांतर; राजीनामासत्र सुरुच)
कपिल मोरेश्वर पाटील यांनी यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा देखील केली. भारतीय जनता पक्षाचे कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडीचे खासदार असून, सध्या ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री आहेत. पाटील हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झाले होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांतून ते भाजपमध्ये दाखल झाले आणि शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान यंदा भिंवडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील हे यंदा हॅट्रीक करणार का याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचे देखील भिवंडी मतदार संघात चांगली पकड आहे. कपिल पाटील यांच्या राज ठाकरे भेटीमुळे याचा फायदा भाजपाला होणार आहे.