भिवंडी लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: काँग्रेसचे सुरेश टावरे की भाजपचे कपिल पाटील यांच्यात कोणाचा पगडा भारी? पाहा सविस्तर
Bhiwandi BJP Kapil Patil (Photo Credits: Facebook)

Bhiwandi Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने निकालही समोर यायला लागलेत. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील(Kapil Patil) आणि काँग्रेसचे सुरेश टावरे (Suresh Tawre)यांच्यामध्ये कडाक्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना उमेदवारी दिल्याने ह्या पक्षातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. तर दुसरीकडे कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे एकूणच दोघांमध्ये अटतटीचा सामना होतोय असंच चित्र पाहायला मिळतेय. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा 1लाख 10 हजार मतांनी पराभव केला होता.

Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

शिवसैनिकांची नाराजी असली तरी 2014 मध्ये कपिल पाटील यांनी मिळवलेला मतदारराजा यावेळी यावेळीही त्यांना साथ देईल असा सूर ऐकायला मिळतो. तर दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकांच्या नाराजीच्या सूराचा परिणाम सुरेश टावरेंच्या मिळालेल्या मतांवर होण्याची शक्यता आहे. लवकरच ह्या कोड्याचे उत्तर जनतेला मिळेल, असेच या मतमोजणीवरुन दिसतय.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रम आणि वेळापत्रकानुसार ही निवडणूक एकूण 7 टप्प्यांत पार पडली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडले.