Anand Teltumbde (Photo Credits: Twitter/@@AnandTeltumbde)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये (Bhima-Koregaon violence case)  माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे (Prof. Anand Teltumbde) यांना 2 एप्रिल पर्यंत दिलासा मिळाला आहे. आज  मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) त्यांच्या अंतरिम जामिनावर (Anticipatory Bail Plea)सुनावणी होणार होती. दरम्यान ही सुनावणी आता 2 एपिल पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने आनंद तेलतुंबडेंची अटक टळली आहे.

ANI Tweet 

शुकवार (22 मार्च) दिवशी मुंबई न्यायलयात न्यायाधीश एन. डब्ल्यू साम्ब्रे (Justice NW Sambre)यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. त्यामुळे अटकेपासून आता काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये तेलतुंबडे हे 22 वे आरोपी आहेत.

पुणे पोलिसांच्या दाव्यानुसार, एल्गार परिषदेच्या 31 डिसेंबर 2017 च्या संध्याकाळी पुण्यात झालेल्या सभेला माओवाद्यांचा पाठिंबा होता. या सभेत चिथावणीखोर भाषणं करण्यात आली परिणामी दुसर्‍या दिवशी 1 जानेवारी 2018 च्या सकाळी हिंसाचार भडकला होता. सध्या या प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरातून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.

भीमा - कोरेगाव हिंसाचारामध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आनंद तेलतुंबडे यांना सोडण्याचे आदेश 2 फेब्रुवारी दिवशी पुणे न्यायालयाने (Pune Sessions Court) दिले होते. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं होत.