Gautam Navlakha (Photo Credits: wikimedia)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी (Bhima Koregaon Case) गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांच्यावर पुणे पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याचा हा गुन्हा मागे घेण्यासाठी नवलखा यांनी केलेली याचिका आज (13 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची कसून तपासणी केली जावी असे सांगितले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज गुन्हा मागे घेण्यास नकार दिला असला तरीही त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.

गौतम नवलखा यांच्यावर शहरी नक्षलवाद आणि माओवाद्यांशी संबंध याबाबत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आरोप रद्द करण्यासाठी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली होती. मात्र आज ही याचिका फेटाळून लावली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांनी दिला आहे. Koregaon Bhima Anniversary 2019 : 201 वर्षांपूर्वी भीमा -कोरेगाव येथे काय घडलं ज्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो

ANI Tweet

1 जानेवारी 2018 च्या सकाळी पुण्यात हिंसाचार भडकला होता. सध्या या प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरातून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.