Bhendwal Ghat Mandani Bhavishyawani 2021: राज्यभरातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकित आले समोर
Bhendwal Bhavishyavani 2019 (Photo Credits: You Tube)

Bhendwal Ghat Mandani Bhavishyawani: राज्यातील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकित अखेर समोर आले आहे. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. राज्यावर आलेले कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्ती याबाबत भेंडवळ भाकितात काय म्हटले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान बुलडाण्यातील ही प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी (Bhendwal Ghat Mandani) शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आता या घट मांडणीतून सांगण्यात आलेले निष्कर्ष पुढे आले आहेत. हे भाकित ऐकण्यासाठी दूरदूरहून शेतकरी इकडे येतात.

या भाकितानुसार यावर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात होणार असून, ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल. या भाकितामध्ये अशी देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.हेदेखील वाचा- Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून मात्र राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल असं भेंडवळच्या घट मांडणीत सांगण्यात आलं आहे. देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित या घट मांडणीत व्यक्त करण्यात आलं आहे. शिवाय देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील, असेही या भाकितात सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी संमिश्र भाकित या घट मांडणीत करण्यात आलं आहे. यावर्षी कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. मात्र तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव राहणार नाही.

कोरोना सारख्या महामारीतून दिलासा मिळण्याचं यावर्षभरात तरी शक्यता नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भेंडवळची घट मांडणीच भाकित जाहीर केलं आहे, यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्या प्रमाणावर आहे तर आर्थिक टंचाई सुद्धा भासेल.