भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी फरार सेवक विनायक दुधाळे अटकेत
भय्युजी महाराज (फोटो सौजन्य- फेसबुक)

मध्य प्रदेशात सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊ केलेले आध्यात्मिक गुरु आणि समाजसेवक भैय्यू महाराज (Bhayyu Maharaj) यांचा सेवक विनायक दुधाळे याला अटक करण्यात आली आहे. तर भैय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर दुधाळे याने पळ काढला होता. मुंबईतल्या आझाद नगर पोलीस स्थानकात त्याला ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रसंत उदय सिंह देशमुख उर्फ भैय्यूजी महाराज यांनी इंदूर येथील राहत्या घरी 12 जून 2018 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे भैय्यू महाराजांची मुलगी कुहूने वडिलांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी केली होती.  या प्रकरणी संशयित आरोपी  विनायक दुधाळे याला अटक करण्यात आले असल्याने आत्महत्या प्रकरणी काही माहिती समोर येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

तर आध्यात्मिक गुरु भैय्यू महाराजांन आत्महत्येच्या वेळेस एक सुसाइड नोट मिळाली होती. तसेच भैय्यू महाराजा हे अंधश्रद्धेच्या आहारीसुद्धा गेले होते. परंतु आत्महत्येपूर्वी भय्यु महाराज ताणतावाखाली असल्याचे ही सांगितले जात होते.