Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter)

७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या देगलूर (Degloor) तालुक्यातून प्रवेश करणाऱ्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज राज्यात शेवटचा दिवस आहे. १४ दिवसांच्या सलग प्रवासानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्राचा (Maharashtra) निरोप घेणार आहे. भारत जोडो यात्रा नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बुलढाणा (Buldhana) जिलह्यात चांगलीचं चर्चेत राहीली. किंबहुना राज्यातील जनतेने राहुल गांधींच्या (Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रेस उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. तरी आज सकाळी भारत जोडो यात्रेस भेंडवळ येथून सुरुवात झाली असुन दिवसा जळगाव जामोद (Jamod) येथे विश्रांती घेणार आहेत. यानंतर ही यात्रा महाराष्ट्रातून (Maharashtra) थेट मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) दिशेने मार्गस्थ होणार आहे. राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) या यात्रेत आज ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासा दरम्यान विविध दिग्दज मंडळी या यात्रएत सहभाग नोंदवला आहे.

 

तरी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) यात्रे दरम्यान शेतकऱ्यांशी (Farmers), विद्यार्थ्यांशी (Students) विशेष संवाद साधतांना दिसले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहुल गांधी सहभागी झाले असुन पुन्हा एकदा कॉंग्रेस महाराष्ट्र जीवंत असल्याचं राहुल गांधींनी दाखवू दिलं आहे. तरी आगामी निवडणूकांमध्ये (Election) ह्याचा काय परिणाम होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Rahul Gandhi: राहुल गांधींच्या भर सभेत आतिषबाजी, अज्ञाताकडून सभा बंद पाडण्याचा प्रयत्न)

राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रानंतर  (Maharashtra)  मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) प्रवेस करत तेथे यात्रा सुरु करणार आहे. भाजप सत्ता असणार राज्य मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रएस कसा प्रतिसाद मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. राहुल गांधीच्या स्वागताची तयारी मध्य प्रदेश कॉंग्रेसकडून पूर्ण झाली आहे. तरी मध्य प्रदेशवासायांची या यात्रएची प्रतिक्षा संपली आहे.