Bharat Bandh: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कांजूर मार्ग स्थानकामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' कडून रेल रोको
Kanjur Marg Station | Photo Credits: Twitter

आज बहुजन क्रांती मोर्चाकडून (Bahujan Kranti Morcha) पुकारण्यात आलेल्या भारत बंदचा (Bharat Bandh परिणाम मुंबई शहरात जाणवायला सुरूवात झाली आहे. आज (29 जानेवारी) सकाळी मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग स्थानकामध्ये (Kanjurmarg Station) कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कार्यकर्ते रेल्वे रूळावर उतरल्याने सीएसएमटीकडे (CSMT) जाणारी वाहतूक सुमारे 20-30 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांसोबतच लोकलमध्येही गर्दी पहायला मिळत आहे.

सकाळच्या वेळेत सीएसएमटीकडे कामावर जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेस चाकरमान्यांचे आणि सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. दरम्यान सीएए, ईव्हीएम आणि एनआरसी विरोधात अनेक आज भारत बंद पुकारला आहे.

ANI Tweet

महाराष्ट्र राज्यात परळी व्यापारी संघटनेने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान मागील महिन्याभरात सतत बंद होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांना होत आहे त्यामुळे आजच्या भारत बंदमध्ये सहभागी न झाल्याचं सांगण्यात आले आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी देखील सीएए विरोधात आंदोलन करत महाराष्ट्र बंद केला होता.