Bhandara Ordnance Factory Blast: भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता स्फोट (Bhandara Ordnance Factory Blast) झाल्याची घटना घडली. यात मृतांचा (Dead) आकडा वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत लष्करासाठी शस्त्रास्त्र बनवले जात होते तेव्हा ही घटना घडली. (Explosion In Bhandara's Ordinance Factory: महाराष्ट्रातील भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट; किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती (Video))
भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी प्रसमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्याचे छत कोसळले. ज्यामध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केला गेली होती. बचाव कार्य सुरू आहे. स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज 5 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर लोखंड आणि दगडाचे तुकडे दूरवर विखुरलेले दिसले.
भंडारा स्फोटाच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू
Blast at ordnance factory in Maharashtra’s Bhandara | Details⤵️@Sriya_Kundu @AdityaRajKaul #Maharashtra #Bhandara #MaharashtraOrdnanceFactoryBlast pic.twitter.com/6UQRQJk1Cy
— News9 (@News9Tweets) January 24, 2025
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटलबाहेर मध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत. आहे. मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक रूग्णालयात येत आहेत. जखमी आणि मृतांना रुग्णालयात नेण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. स्फोटानंतर कारखान्यातून अनेक किलोमीटर अंतरावर धुराचे लोट दिसत होते.
आरडीएक्स उत्पादन शाखेत स्फोट
हा स्फोट आरडीएक्स उत्पादन शाखेत झाला. जवाहर नगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आरकेआर शाखा विभागात हा स्फोट झाला. आरडीएक्स येथे बनवले जाते. यामध्ये हा स्फोट झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी या अपघाताचे वर्णन मोदी सरकारचे अपयश असे केले आहे.
भंडारा येथील या कारखान्यात चाचणी सुविधा आणि प्रयोगशाळा देखील आहेत. जिथे सैन्यासाठी अॅसिडसह विविध प्रकारचे स्फोटके तयार केली जातात. येथे चाचणी सुविधा आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा देखील आहेत. लहान शस्त्रांमध्ये वापरला जाणारी स्फोटक पावडर देखील येथे तयार केला जाते. दुसऱ्या महायुद्धात या पावडरचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता.
घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ऑर्डनन्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटाबद्दल दुःख झाले. पीडित कुटुंबांना माझ्या संवेदना. जखमी लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करतो. घटनास्थळी बचाव पथके तैनात आहेत. बाधित लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
2024 मध्येही अशीच एक घटना
जानेवारी 2024 मध्येही भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सीएक्स विभागात स्फोट झाला होता. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याआधी भंडाराजवळील सनफ्लॅग कंपनीत स्फोट झाला होता. ज्यामध्ये तीन कर्मचारी भाजले गेले होते.