महिन्याभरापूर्वी भंडारा जिल्ह्यात रूग्णालयात लागलेल्या आगीमध्ये (Bhandara Hospital Fire Incident) 10 बालकांचा जीव गेला होता. या जळीत कांडाला माहिना उलटला असला तरीही त्याचा फॉरेंसिक सायन्स लॅब (Forensic Science Laboratory) चा रिपोर्ट मात्र अद्याप प्रतिक्षेमध्ये आहे. पोलिसांनी काही प्रश्नांसह फॉरेंसिक सायन्स लॅब रिपोर्ट पुन्हा त्यांच्याकडे पाठवून लवकरात लवकर त्याची पूर्तता करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. Bhandara Hospital Fire: राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटीस; भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणी मागितला अहवाल.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर कक्षाला 9 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागली आणि 10 बालकांचा जीव गेला. दरम्यान याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमून दिलेल्या समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पण या जळीतकांडाचा उलगडा होण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट प्रतिक्षेमध्ये आहे. सध्या हा विभाग पोलिसांनी सील केलेला आहे.
ANI Tweet
Maharashtra: Forensic Science Laboratory has submitted its report to police in Bhandara Hospital fire incident which claimed lives of 10 newborns on Jan 9. Police say that they have sent the report back to FSL with a few queries, won't comment until the final report is received
— ANI (@ANI) February 10, 2021
महाराष्ट्र सरकारने या रूग्णालयातील जळलेल्या भागाची पुन्हा बांधणी आणि डागडुजी करण्यासाठी Rs 1.53 कोटीचा निधी मंजूर केला आहे. मात्र हे काम सुरू करण्यासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतिक्षा आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी, अधिकार्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन घडल्या प्रकराराची माहिती घेतलेली आहे.