Bhandara Hospital Fire: भंडारा अग्नितांडव प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासाठी शनिवारची (9 जानेवारी) पहाट दुर्दैवी ठरली आहे. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात (Bhandara Hospital Fire) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याच प्रकरणावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. या दुर्घटनेची माहिती होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस (Devendra Fadnavis) यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) गंभीर आरोप केले आहेत.

'भंडारा जिल्ह्यातील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये बालकांचा मृत्यू होणे, ही लाजीरवाणी घटना आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. भंडारा जिल्हा रूग्णालय प्रशासन व फायर विभागाचे ऑडिट न झाल्यामुळेच ही घटना घडली आहे. यामुळे याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय, मृत्यु पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आम्हाला यात राजकारण करायचे नाही. परंतु, सरकारकडून करण्यात आलेले दावे चुकीचे ठरत आहेत. हे या दुर्घटनेतून स्पष्ट दिसत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. हे देखील वाचा- Bhandara Hospital Fire: 'ह्यांच्या चौकशांना कोणी भीक घालत नाही' म्हणत निलेश राणे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-

दरम्यान, या प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. "भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही हे लक्षात आले. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की, ते कुणालाच जुमानत नाही", अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे.