भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवण्याची शक्यता; प्रसारमाध्यमांनी दिले वृत्त
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyar | (Photo Credits: Facebook)

राजधानी दिल्लीच्या सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी एक धक्कादायक वृत्त दिले आहे. या वृत्तामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आणि तर्क-वितर्कांना ऊत येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी देलेले वृत्त असे की, महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor of Maharashtra) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पदावरु हटवले बदलले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार याबाबत गांभीर्याने विचर करत असल्याचेही समजते. मात्र, केंद्र सरकारकडून मात्र याबाबत अधिकृत प्रकारे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अथवा माहिती प्रसारित करण्यात आली नाही. तसेच, या वृत्ताला पुष्टीही मिळू शकली नाही.

एबीपी माझा या खासगी वृत्तवाहीणीने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणूक 2019 नंतर हाती आलेला जनमताचा निकाल. त्यानंतर सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजप यांच्यात झालेला सत्तासंघर्ष. त्यामुळे सरकार स्थापनेस झालेला विलंब आणि त्यानंतर राज्यावर लागलेली राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट हटविण्याचा रातोरात घेतला गेलेला निर्णय यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घाई गडबडीत उरकलेला शपथविधी. अपुऱ्या संख्याबळामुळे त्याची राजीनाम्यात झालेली परिणिती आणि भाजपची कोंडी या सर्व प्रकारामुळे एकूण यंत्रणा आणि ही परिस्थिती हाताळणारे जबाबदार लोक या सर्वांचीच प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे ही प्रतिमा सुधारण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन भगत सिंह कोश्यारी यांना हटवण्याची किंवा त्यांना दुसऱ्या राज्यात पाठवण्याबाबत विचार सुरु आहेत. दरम्यान, केंद्र सरकार, राष्ट्रपती भवन अथवा राजभवन यांच्याकडूनही राज्यपालांना हटविण्याबाबत अधिकृतरित्या कोणतेही माहिती अद्यापपर्यंत आली नाही.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात गेले तीन-चार दिवस चांगलेच वादळी ठरले. या वादळाची सुरुवात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवल्यापासून झाली. राज्यातून राष्ट्रपती राजवट कधी हटवली गेली आणि राज्यावर नवे सरकार कधी अस्तित्वात आले याचा जनतेला बराच काळ पत्ता लागला नाही. जेव्हा प्रसारमाध्यमांतून वृत्त झळकले तेव्हा जनतेला राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्याची माहिती मिळाली. (हेही वाचा, भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, सी विद्यासागर राव यांचा पदाचा कार्यकाळ संपला)

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात राज्यात सत्तेवर आलेले सरकार, राज्यपालांचा निर्णय आणि एकूणच सर्व प्रपंच सगळेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घटना घडामोडींनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या नाट्यावर पडदा पडला.