BEST Strike: बेस्ट संपाचा आजचा सातवा दिवस आहे. बेस्ट कृती समिती आणि सरकारमध्ये चर्चा सफळ झाली असली तरीही या बैठकीमधून तोडगा निघत नसल्याने संप कायम ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. आज मुंबईत बेस्ट कर्मचार्यांच्या संपामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेने उडी घेतली आहे. पक्षाची अधिकृत भूमिका नसली तरीही काही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून संप मिटत नाही तोपर्यंत कामकाज ठप्प करण्याची भूमिका घेतली आहे.
आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील वरळी भागतील कोस्टल रोडचं काम बंद पाडलं. त्यापाठोपाठ गिरगावामध्ये मेट्रो 3 चं काम बंद पाडण्याचा, मुंबईच्या रस्त्यांवर धावणार्या काही खाजगी आणि एनएमएमटीच्या बस रोखण्याचा प्रयत्न केला आहे.चेंबूरच्या प्रियदर्शनी भागामध्ये हा प्रकार घडला. पोलिस संरक्षणामध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. BEST Strike: मनसेने कोस्टल रोडचं काम बंद पाडले
सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये बेस्ट संपाबाबत सुनावणी सुरू आहे. आज सातव्या दिवशी तरी बेस्टचा संप संपणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.