BEST Strike: सलग सातव्या दिवशीदेखील 'बेस्ट' संप कायम, उच्च स्तरीय समितीची  बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
BEST STRIKE | (Photo courtesy: ANI)

BEST Strike: बेस्टच्या संपावर सलग सातव्या दिवशीदेखील कोणताच तोडगा न निघाल्याने संप कायम राहिला आहे. 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेला संप आजही कायम राहणार आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांची आजही परवड कायम होणार आहे. उच्च स्तरीय समितीची बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई  उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)  दिले आहेत. BEST Strike : संपावर राहून तडजोडीची भाषा चुकीची; बेस्ट कर्मचाऱ्यांना कोर्टाने झापले

सामान्य मुंबईकरांना वेठीस धरून अशाप्रकारे सलग मुंबईत बेस्ट सेवा (BEST)  ठप्प ठेवणं कितपत योग्य आहे? उद्या संप मिटला नाही तर मेस्मा अंतर्गत कारवाई केल्यास काय होऊ शकते? अशाप्रकारचे प्रश्न न्यायालयाने आज सरकारसमोर ठेवले आहेत. दरम्यान उच्च स्तरीय समितीची बैठक घेऊन याविषयी अहवाल सादर करावा अशाप्रकारचे आदेश महाधिवक्त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या म्हणजे (15 जानेवारी, मंगळवार) या दिवशी दुपारी तीन वाजता याप्रकारणी पुढील सुनावणी होणार आहे.  BEST Strike: MNS कार्यकर्त्यांनी कोस्टल रोड पाठोपाठ गिरगावात मेट्रो-3चं कामही बंद पाडलं, सायन-पनवेल मार्गावर बस रोखण्याचा प्रयत्न

वेतनवाढीसोबतच बेस्ट कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सलग सात दिवस हा संप सुरू असल्याने सामान्य मुंबईकरांची प्रवासदरम्यान परवड होत आहे.