BEST BUS | X

मुंबई मध्ये रेल्वे नंतर नागरिकांच्या सोयीची बेस्ट बस सेवा (BEST Bus Service) आहे. मात्र आज (13 जानेवारी) खाजगी कंपनीच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने मुंबईत काही भागात बेस्ट बस सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपामागील ठोस कारण समोर येऊ शकलेले नाही मात्र सध्या बेस्टची सेवा काही ठिकाणी प्रभावित झाली आहे. मीडीया रीपोर्ट्सनुसार, खाजगी कंपनीच्या एका अधिकार्‍याने गर्भवती कंडक्टर सोबत गैरवर्तन केल्याने संप सुरू करण्यात आला आहे.

मुंबई मध्ये सध्या संप हा केवळ प्रतिक्षा नगर बस डेपो पुरता मर्यादित आहे. त्यामुळे या डेपो च्या बस सेवेवर परिणाम झाला आहे. युनियन नेत्याच्या माहितीनुसार, 100 बस बंद असल्याचं समोर आलं आहे. असे वृत्त आहे. मातेश्वरी च्या 110 बस प्रतिक्षा नगर येथील डेपोमधून चालवल्या जातात. आज सकाळपासून संप सुरू झाल्याने आज सकाळपासून एकही बस धावलेली नाही. अशी माहिती बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते सुहास सामंत यांनी दिल्याचं चं वृत्त आहे. धारावी डेपो मधूनही 100 बस असतात त्याही धावलेल्या नाहीत.

मुंबई मध्ये बेस्ट बस सेवा विस्कळीत का?

प्राथमिक माहितीनुसार, एका महिला बस कंडक्टरने तिच्या गर्भावस्थेच्या अंतिम टप्प्यात असल्याने कंपनी व्यवस्थापकाकडे हलकी कामे/ कमी दगदगीची कामे मागितली, मात्र मॅनेजरने ती नाकारली आणि महिलेचा अपमान केला. यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवत संप पुकारला आहे. कमी आणि उशिरा मिळणाऱ्या पगारामुळे कर्मचारीही नाराज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बस कंडक्टर व चालकांचे पगार वेळेवर होत नसून त्यांना कायम कामगार म्हणून कामावर घ्यावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

वेट लीज मॉडेलअंतर्गत खाजगी ऑपरेटर बसच्या देखभालीची जबाबदारी घेतात आणि चालक तसेच कंडक्टरच्या वेतनाचा खर्च उचलतात. मुंबईत मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट धारावी आणि सायन प्रतीक्षा नगर बस डेपो प्रमाणेच सांताक्रूझ, मजास, वडाळा, मुलुंड  इथेही काम करतात.