मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम विशेष असते. गल्लोगल्ली असलेल्या गणेश मंडळामध्ये बाप्पाची आराधना केली जाते. अनेक सार्वजनिक मंडळाच्या गणपतीला भेट देण्यासाठी भाविक देशा-परदेशातून येतात. भाविकांची प्रवासाची सोय व्हावी म्हणून बेस्टने हॉप ऑन हॉप ऑफ बस (Hop On Hop Off) सुरू केली आहे. बेस्ट कडून मध्यरात्री देखील त्यासाठी एसी बस सोडल्या जाणार आहेत.
मुंबई मध्ये 3 सप्टेंबर पासून या गणेशोत्सव दर्शनासाठी विशेष एससी बस सुरू करण्यात आल्या आहेत. Indian Express च्या रिपोर्ट्सनुसार, बेस्ट बस सर्व्हिस 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान रात्री 10 ते पहाटे 6 या वेळेत सुरू राहणार आहे. बेस्टच्या Hop On Hop Off बस दर 25 मिनिटांनी चालवल्या जाणार आहेत.
दक्षिण मुंबईमध्ये सीएसएमटी स्टेशन वरून ही बससेवा सुरू होईल. त्याचा शेवटचा स्टॉप वडाळा बस डेपो असणार आहे. या बससेवेमध्ये मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा, भायखळा स्टेशन, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर स्टेशन (पूर्व) आणि वडाळा डेपो असे स्टॉप असणार आहेत. या बसचे तिकीट 60 रूपये आहे. ऑर्डिनरी,लिमिटेड आणि एसी बस चे पास देखील यामध्ये वैध ठरतील. Ganeshotsav 2022: मिरज मध्ये मीरसाहेब दर्गाहजवळ गणपती बाप्पाची मिरवणूक येताच मंडळाने केलेल्या कृतीची होतेय वाहवा! (Watch Video).
बेस्टने सुरू केलेल्या या बसमध्ये प्रवासी चढला की दर्शनासाठी तो कुठेही उतरू शकतो. दर्शन झालं की पुढल्या बस मध्ये चढू शकतो.