Belgaum Municipal Election Result 2021: भारतीय जनता पक्ष बहुमताने सत्तेत, काँग्रेस, Maharashtra Ekikaran Samit विरोधी पक्षात
Gram Panchayat Elections | (File Image)

बेळगाव महापालिका निवडणूक 2021 (Belgaum Municipal Corporation Election) मध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) एकहाती सत्ता मिळविताना दिसत आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या मतमोजणी निकालानुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. बेळगाव (Belgaum) महापालिकेत बहुमतासाठी 30 जागांची आवश्यकता असते. जी भाजपने पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजप पाठोपाठ काँग्रेस (Congress), महाराष्ट्र एकिकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti) आणि एमआयएम (MIM) असा विजयी उमेदवारांचा क्रम पाहायला मिळतो आहे.जाणून घ्या आतापर्यंतचा निवडणूक निकाल.

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समिती विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असा सामना रंगेल असे चित्र होते. मात्र, तसे घडताना दिसले नाही. भाजपने पहिल्यादाच महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. बेळगाव महापालिका स्थापन झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष निवडणूक चिन्हावर लढले होते. त्यामुळे मतदारांसाठीही हा अनुभव नवा होता. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. शिवाय, महाराष्ट्र एकिकरण समिती, एमआयएम यांच्यासह अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. (हेही वाचा, Belgaum Municipal Election Result 2021: बेळगाव महापालिकेवर कोणाचा झेंडा? आज ठरणार 385 उमेदवारांचे भवितव्य)

बेळगाव महापालिका निवडणूक मतमोजणी अपडेट

भाजप : 33

काँग्रेस : 7

महाराष्ट्र एकीकरण समिती : 2

एमआयएम : 1

दरम्यान, बेळगाव महापालिकेसाठी एकूण 58 प्रभागांसाठी 385 उमेदवार मैदानात रिंगणात होते. त्यात भाजप- 55, काँग्रेस- 45, महाराष्ट्र एकीकरण समिती- 21, जे डी एस- 11, आम आदमी- 37, एआयएमआयएम- 7, अन्य- दोन, अपक्ष- 217 उमेदवारांचा समावेश होता.

बेळगाव महापालिकान निवडणुकीत कर्नाटक सरकारकडून अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही तसा आरोप केला होता. बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा तसेच महाराष्ट्र एकिकरण समितीला यश मिळू नये यासाठी बरेच उपोद्व्याप केले. तसेच, त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी काय करायचे याबाबतही खल करण्यात आला, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.