
महिलेचा विनयभंग (Molestation) करुन तिला विष पाजल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या घटनेत विषबाधा झालेल्या पीडितेची मृत्यूशी झूंज सुरु आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ही घटना बीड (Beed Crime) येथील चांदणे वस्तीत घडली आहे. आरपीने पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबालाही मारहाण झाली आहे मात्र पोलीस तक्रार घ्यायला तयार नाहीत असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. प्राप्त माहितीनुसार, बीड शहरात असलेल्या चांदणे वस्ती परिसरात कुंदन मंकेश चांदणे (वय-27 वर्षे) आपल्या घरी घरकाम करत होती. दरम्यान, याच परिसरात राहणाऱ्या सुंदर चांदणे ,किशोर चांदणे, मसु चांदणे,आणि सोनी चांदणे यांनी कुंदणच्या घरात प्रवेश केला. जुण्या भांडणाचा मुद्दा उपस्तित करत त्यांनी कुंदन चांदणे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत खाली पाडले आणि त्यांना जबरदस्तीने विष पाजले.
दरम्यान, पीडिता कुंदण चांदणे हिच्या आईने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना निवेदन दिले आहे. या निवदेनात जीवावर बेतेल अशी घटना घडूनही पोलिस प्रशासन कोणतीही पावले उचलत नाही. आमची तक्रार दाखल करुन घेत नाहीत, असा आरोप केला आहे. पीडितेच्या आईने अधिकक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याच लोकांनी या आधीही माझ्या बहिण आणि तिच्या कुटुंबावर हल्ला केला होता. आम्हालाही मारहाण केली होती. आरोपी हा सावकारकी करतो. त्याच्यावर 302 अन्वये आगोदरच गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलीस आमची दखल घेत नाही, आरोपीवर गुन्हा दाखल करत नसल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, सेक्रेटरीसोबत लफडं, पत्नीला वाऱ्यावर सोडलं; साठीतल्या महिलेला कोर्टाकडून 30 हजार रुपयांची पोटगी मंजूर)
आरोपींनी जुन्या भांडणातून कुरापत काढली. तिचा विनयभंग केला आणि तिला विषही पाजले. या कृतीमुळे आज ती मरणाच्या दारात आहे. असे असूनही पोलीस दाद देत नाहीत. आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल पीडितेच्या वडीलांनी उपस्थित केला आहे.