KDMC: केडीएमसी मुख्याल्यात मधमाशांची दहशत, महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांकडून चिंतेचा विषय
Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मुख्यालयात मधमाशांची दहशत (Honey Bees) आहे. केडीएमसी भवनात (KDMC Bhavan) मोठ्या प्रमाणात मधमाशांचा पोळा असल्याने  या मधमाशांचा चाव्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, मात्र महापालिका प्रशासन (Municipal Administration) याकडे लक्ष देत नसल्याने चिंतेचा विषय बनला आहे. तसेच  नागरिकांकडून या मधमाशांचा पोळ्याचा त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे. मधमाशांचा संभाव्य धोका ओळखून महापालिका प्रशासनाने काही खबरदारीची पावले उचलावीत असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

कल्याण पश्चिमेकडील केडीएमसी मुख्यालयाच्या इमारतीवर अनेक मधमाशांनी आपले पोळे बांधले आहेत आणि काही वेळा लोकांची शिकार करून पालिका मुख्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात उडतात. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे देखील वाचा: आदल्या दिवशी घेतलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; कुटुंबातील एकाचा मृत्यू, तर 3 जण जखमी)

केडीएमसी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज

स्थानिक पत्रकारांसोबतच अनेकजण या मधमाशांचे बळी ठरले आहेत. काही मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. केडीएमसी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मधमाशांचा संभाव्य धोका ओळखून महापालिका प्रशासनाने काही खबरदारीची पावले उचलावीत, कारण तसे न झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.