ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थकारण हदारवून टाकणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi Stock Market Froud Case) येथील विशाल फटे (Vishal Fateh) घोटाळ्यात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. विशाल फटे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशाल फटे याने अनेकांना सांगितले की, शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवले आणि परतावा दिला. पण, त्याने शेअर मार्केटमध्ये कोणाचीच आणि कसल्याच प्रकारची गुंतवणूक केली नव्हती. तो केवळ लोकांच्या रकमा गोळा करायचा आणि एकमेकांना फिरवत राहायचा. हळूहळू रक्कम फुगत गेली आणि देणीही वाढत गेली. त्यामुळे हे सगळे वर्तुळ आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहून विशाल फटे फरार झाला अशी माहिती पुढे येत आहे. सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडू आरोपी विशाल फटे याची 8 दिवस चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत ही माहिती पुढे येते आहे.
गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिश दाखवून विशाल फटे याने अनेकांना गळाला लावले. आपले पैसे आपण शेअर बाजारात गुंतवत असतो. त्यातून आपण लोकांना मोठ्या प्रमाणावर परतावा देतो. असे तो दाव्याने सांगत होता. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच होत नव्हते असे आता पुढे येऊ लागले आहे. (हेही वाचा, Barshi Stock Market Scam: शेअर मार्केट गुंतवणुकीतून परताव्याचे आमिष, बार्शी येथील कोट्यवधी रुपयांच्या 'फटे स्कॅम' प्रकरणी एकास अटक)
एका टप्प्यावर देणी वाढल्यानंतर विशाल फटे हा फरार झाला होता. तो पसार झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी पोलिसांमध्ये तक्रारी केल्या. अखेर 17 जानेवारी रोजी विशाल फटे हा स्वत: पोलिसांमध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आले. या वेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. दरम्यान, पोलिसांचा पोलीस कोठडीचा हक्क अबादित राहिला असून आवश्यकात भासल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.