महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोना विषाणूचे संकाट वावरत असताना बारामती (Baramati) येथील दुकानफोडीच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बारामती येथील महावीर पथ येथे मे. राजस्थान सारीज दुकानाचे बेसमेन्ट गाळ्यातून अद्यात चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकलून त्यातील माल चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात बारामती पोलिसांना यश आले आहेत. धक्कादायक म्हणजे, या टोळीत 5 महिलांचा समावेश असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
आरती शंकर पाथरकर (वय 25 वर्षे), सारिका लाला भाले (30 वर्षे), दुर्गा आकाश साळुखे (वय 25 वर्षे), शकिला इस्माईल कुरेशी (वय 22 वर्षे), असे चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिलांची नावे आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्यात 12 एप्रिल रोजी दुकानफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला आहे. दरम्यान, गुन्हे शोध पथकाने वरील आरोपींची कसून चौकशी केली. या तपासात आरोपी महिलांनी चोरी केल्याची कबूली दिली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 19 हजार, 160 रुपये किंमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे देखील वाचा-नाशिक: ऑनलाईन लॉटरी जिंकण्याच्या नादात 10 लाख रूपये गमावून पोलिसांत खोटी तक्रार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारींचा वृत्तात घट होत असताना वरील घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणातील आरोपींची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासली जात आहे. दुकानाच्या कपड्यात याआधीही काही महिला चोरी करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.