
मला शेतीतले फारसे कळत नसले तरी मी जाणून घेत असतो. आज मी येथे आलो नसतो तर, मोठ्या आनंदाला मुकलो असतो. योग्य वेळ आली की सगळं कसं जुळून येतं. राज्याची सत्ता योग्य वेळी आपल्या हाती आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमा वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतीमध्ये नवनवे प्रयोग व्हायला हवेत. त्यासाठी या क्षेत्रात होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचले पोहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. शेतीमध्ये बरेच बदल होत आहेत. मातीविना शेतीचे प्रयोगही होत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, बारामती: अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन, पण त्यांना ते जमलं नाही; शरद पवार यांचा विरोधकांना टोला)
दरम्यान, या वेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांनाही चिमटे काढले तसेच, आपल्या मित्रपक्षांकडूनही आपेक्षा व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, सुप्रियाने (सुप्रिया सुळे) मला विचारले की, घड्याळाचे तुमचे दुकान आहे काय? मी तिला म्हणालो की, नाही माझा घड्याळाचा व्यवसाय नाही. पण, घड्याळवाले माझे पार्टनर आहेत. योग्य वेळ आली की सगळं कसं जुळून येतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.
मनसे कार्यकर्त्यांची नवी मोहीम, #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी या नावाचा सुरु केला हॅशटॅग - Watch Video
तसेच, हे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी आपले आशीर्वाद सोबत राहुद्या. यात अजितदादाही आहेत, असे म्हणत आपल्या सहकारी पक्षांकडून आपल्याला सहकार्य मिळावे अशी आपेक्षाही ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.