प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना (Banking License) रद्द करण्यात आला आहे. ज्यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. नियमबाह्य, कर्ज, थकबाकी यांसारख्या अडचणी यासारख्या गोष्टींसाठी परवाना रद्द केला आहे, अशी माहिती समोर येत आहे. आरबीआयने आज जाहीर केलेल्या परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी लटकल्या आहेत. बॅंकेतील 5 लाखांच्या आतील ठेवी असलेल्या सभासदांना या ठेवी टप्प्याटप्प्याने दिल्या जातील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

कराड जनता सहकारी बॅंकेचे गेल्या अनेक वर्षापासून प्रकरण गाजत होते. दरम्यान, या बॅंकेविरोधात बेकायदेशीररीत्या कर्ज, तक्रारीही दाखल झाल्या होत्या. कराड शहर पोलिसात 2017 मध्ये जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 6 ऑगस्ट 2019 मध्ये बॅंकेच सचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यावेळी बॅंकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता बॅंकेच्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, बॅंकेबाबत आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या बॅंकेवर कारवाई करत त्यांचा बॅंकिग परवाना रद्द केला आहे  हे देखील वाचा- ITR Filing For 2019-20 यंदा 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

कराड जनता सहकारी बॅंकेच्या एकुण 29 शाखा आहेत, तर या बॅंकेचे एकुण 32 हजार सभासद आहेत. या बॅंकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी शाखा आहेत. दरम्यान, आरबीआयने केलेली आजची कारवाई ही सहकार क्षेत्रातील मोठा दणका म्हणून बोलला जात आहे.