Energy Drinks Ban in Maharashtra: महाराष्ट्र सरकार कॅफिनयुक्त (Caffeine) एनर्जी ड्रिंक्स (Energy Drinks) संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफिन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करणार आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (MFDA) मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी शुक्रवारी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी हे आश्वासन दिले. (हेही वाचा - Remove Bournvita as Health Drink: बोर्नव्हिटासारखे पदार्थ हेल्थ ड्रिंक्स नाहीत, या पदार्थांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील या श्रेणीतून काढून टाका; केंद्राचा कंपन्यांना आदेश)
MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल. सध्याच्या नियमांनुसार, एक लिटर कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेयांमध्ये 145 मिली आणि 300 मिली दरम्यान कॅफिनचे प्रमाण अनुमत आहे, असं आत्राम यांनी सांगितलं. (हेही वाचा - Red Bull काय आहे आणि ते प्यायल्याने काय होते? जाणून घ्या अधिक)
कौन्सिलच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी आत्राम यांना बंदी घालण्यात येणाऱ्या पेयांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील MFDA अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.