Balasaheb Thackeray Birth Anniversary: आदित्य ठाकरेने सोशल मीडियात शेअर केला 'आजा' बाळ ठाकरेंसोबतचा दुर्मिळ फोटो
Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

Bal Thackeray Jayanti 2019: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Keshav Thackeray)  यांची आज 93 वी जयंती आहे. 2012 साली मातोश्री या ठाकरे कुटुंबीयांच्या राहत्या घरी बाळासाहेबांनी आजारपणाशी झुंज देताना अखेरचा श्वास घेतला. आज 93 व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणार्‍या अनेक चाहत्यांनी विविध माध्यमातून आदरांजली वाहली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीदेखील बाळासाहेबांसोबतची एक खास आठवण सोशल मीडीयामध्ये शेअर केली आहे. Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना भवनासमोर 33000 रुद्राक्षांनी साकारले हुबेहुब बाळासाहेब! (Photos)

बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे

बाळासाहेब ठाकरे कुटुंबांप्रमाणेच शिवसेनेतील युवकांसोबत त्यांच्या वयाचं होऊन बोलत असे आदित्य ठाकरेंनी अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे. आज 93 व्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरेंसोबत आदित्य ठाकरेंनी लहानपणी क्रिकेट खेळतानाची एक आठवण शेअर केली आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब आदित्यच्या पाठीमागे उभे आहेत.

2010 च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेच्या हातामध्ये तलवार देऊन 'युवासेनेची घोषणा केली होती. शिवसेनेसोबत युवासैनिक 'युवासेने'सोबत महाराष्ट्रभर काम करतात.