Shiv Sena Party chief Uddhav Thackeray and Chief Minister Devendra Fadnavis

Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) बांधकाचा शुभारंभ मुंबई महापौर बंगला येथे बुधवारी करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांच्या हस्ते गणेशपुजन झाल्यावर प्रत्यक्ष बांधकामाला अधिकृतरित्या सुरुवात झाली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पुनम महाजन, शिवसेना नेत्या पुनम महाजन, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (बुधवार, 23 जानेवारी) जयंती आहे. जयंती दिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर बंगल्याच्या हस्तांतरणाची अधिकृत कादगपत्रे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली. हीच कागदपत्रे पुढे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे सोपवीण्यात आली. अधिकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकास अधिकृतरित्या आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. (हेही वाचा, ..जेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, 'संज्या, फिकर मत कर', 'कमळीची चिंता करु नका')

महापौर बंगल्यात सुमारे ११,५०० चौरस मीटर इतक्या जागेवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. ही जागा शिवाजी पार्कजवळ आहे. या स्मारकासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी राज्य मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. या स्मारकाला मुंबई महापालिकेनेही मंजूरी देत महापौर बंगल्याची ही जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक भव्य स्वरुपात उभा राहिल्याचे पाहायला मिळणार आहे.