Adarsh School Badlapur Sexual Assault Case: दिनांक 12 आणि 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येशीत नामांकित शाळेत म्हणजेच आदर्श विद्यालयात(Adarsh School) 4 वर्षीय विद्यार्थीनींवर शाळेत लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault Case)झाले. घडलेला प्रकार त्यातील एका विद्यार्थीनीने तिच्या आजोबांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी फोन केला असता. त्यांनीही त्यांची मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीने तिच्या सुच्या ठिकाणी मुंग्या चावत असल्याचे सांगितल्यानंतर तेव्हा तिच्यासोबत काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. (हेही वाचा:Badlapur Sexual Assault Case: बदलापुरमध्ये आंदोलनातील 300 जणांवर गुन्हे, 28 जणांना पोलिसांकडून अटक; आज कोर्टात हजर करणार)
पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं डॉक्टरनी सांगितलं. त्यानंतर पालकांनी स्टेशनमधे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा दोन दिवस त्यांची तक्रार दाखल करण्यात आली नाही. पोलिसांच्या आशा वर्तणामुळे ही घटना उघडकीस आली आणि संपूर्ण बदलापूर लहान मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात पेटले. परिणामी काल आदर्श शाळेवर पालकांनी मोर्चा काढला. शाळेत तोडफोड केली. रेल्वे अडवली, वाहनांची तोडफोड केली. संपूर्ण बदलापूर बंद ठेवले गेले. दरम्यान, 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. (हेही वाचा: )
एका खासगी कंपनीमार्फत शिंदे यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली होती. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परिणामी लहान मुलींना वॉशरूममध्ये नेण्यासाठी कोणतीही महिला कर्मचारी शाळेत नव्हती का? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याच म्हटलं आहे. आरोपीला कडक शिक्षा सुनावण्यात येईल असा शब्द सरकारकडून देण्यात आला आहे. विरोधी पक्षानेही हे प्रकरण उचलून धरले आहे. नराधमाला फाशी द्यावी असं खासदार सुप्रिया सुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं. पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशील पणामुळे विरोधकांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.