Mega Block | (File Image)

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आंबेडकरी अनुयायांचा महासागर उसळणार आहे. मात्र दोन्ही लोकल रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक (Local Megablock) नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी जनतेची गैरसोय होणार आहे. याची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी रेल्वेकडे केली आहे. (हेही वाचा - Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दमदार भाषणांचा आजही जगात डंका, पाहा व्हिडिओ)

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी शहरातील पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरात नागरिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. हा बदल 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिल रोजी रात्री दोन वाजेपर्यंत राहील.   पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. आणि ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

अमरावती शहरात मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता अमरावती शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलिस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली. हा बदल केवळ एक दिवसापूरता असेल असेही बारवकर यांनी नमूद केले. अमरावती मधील इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक 14 एप्रिलला पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाेलिसांनी इतर मार्गाने वळविली आहे.