CM Eknath Shinde ( (Photo courtesy: Eknath Shinde Twitter Account)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) लाखोंच्या संख्येने भीमसागर चैत्यभूमीवर एकवटला आहे.  आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. Babasaheb Ambedkar) यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण केली.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं की, पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकार लवकरात लवकर इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले आहे.   (हेही वाचा - Mahaparinirvan Din 2023 Local Holiday: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत 6 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; महाराष्ट्र सरकारचा निर्णय)

पाहा पोस्ट -

यावेळी चैत्यभूमीवर जमलेल्या भीमसागराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी करण्याचं आणि समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे.  या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची बाब म्हणजे इंदु मिल स्मारक लवकर पूर्ण करणे आहे.'' जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

''डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम आहे. भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.