ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश केला आहे. घोलप यांच्या प्रवेशामुळे शिर्डीमध्ये ठाकरे गटाला (Shivsena UBT) धक्का बसलाय. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचं निशाण हाती घेतलं आहे. पक्षप्रवेशावेळी नाशिकमधून लोकसभेसाठी इछुक असलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी ही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.  नाशिक का खासदार कैसा हो, हेमंत अण्णा जैसा हो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.  (हेही वाचा - Loksabha Election 2024: ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक मतदारसंघ सोडणार नाही; शिवसेनेचा जागेचा आग्रह कायम)

पाहा व्हिडिओ -

यावेळी बबनराव घोलप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेत मी निष्ठेने काम केले, मात्र पक्षनिष्ठा ठेवूनही संपर्कप्रमुख पदावरून काढण्यात आलं. प्रामाणिक राहूनही माझ्यावर अन्याय करण्यात आला. मी विचारलं माझे पद का काढण्यात आलं, पण मला काहीही सांगण्यात आलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे. ते जी जबाबदारी देतील ती पार पाडणार आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम करेन, असं बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बबनराव घोलप आणि संजय पवार यांचं मी स्वागत करतो. आरपीआयचे नगरचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे हे सुद्धा शिवसेनेत दाखल झाले. वरळीमधील 100 महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचं सुद्धा स्वागत. बबनराव यांना धन्यवाद देतो यासाठी कारण त्यांनी माझ्यासमोर कोणतीही मागणी केली नाही. ते राज्यभर आणि देशभर काम करतात. मागे सुद्धा त्यांच्यासोबत बैठक झाली. याआधी आपण अनेक निर्णय घेतले आहेत. मुंबईत 200 कोटी रुपयांचे भवन उभे राहण्याचा आपण निर्णय घेतला.