Baba Siddique | (Photo Credit -Facebook)

वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकींच्या (Zeeshan Siddique)ऑफिस बाहेर 12 ऑक्टोबरला दसर्‍या रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. सध्या या प्रकरणी 3 जण अटकेत असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. या हत्येमध्ये विविध बाजूने तपास सुरू असताना आता हत्येच्या घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेला पोलिस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे (Shyam Sonawane) यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या सोनावणे यांच्या विरूद्ध अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे.

सिद्दीकींच्या सुरक्षेसाठी श्याम सोनावणे असताना देखील ते हल्ला झाला तेव्हा काहीच करू शकले नाही त्यामुळे त्यांच्याकडून कामात कसूर झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान श्याम सोनावणे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेपर स्प्रे चा वापर केला होता तसेच फटाक्यांच्या धुराचा वापर करत गोळ्या झाडल्याने काहीच प्रत्युत्तर देण्यास वेळ मिळाला नाही असं म्हटलं आहे. दरम्यान श्याम सोनावणे हे प्रोटेक्शन ब्रांचचे कर्मचारी आहेत. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो .

TOI च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, सिद्दीकीला नियुक्त केलेल्या संरक्षण शाखेतील सर्व हवालदारांना कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याने SOP का पाळली नाही हे ठरवण्यासाठी चौकशी केली जात आहे. दोन कॉन्स्टेबल दिवसा आणि एक रात्री ड्युटीवर होते. 12 ऑक्टोबर रोजी, दिवसाच्या शिफ्टचा हवालदार रात्री 8 वाजता निघून गेला आणि सिद्दिकींची रात्री 9.30 च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दरम्यान बाबा सिद्दीकी हे माजी मंत्री होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेसला रामराम करत एनसीपीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंग कडून घेतल्याची एक कथित पोस्ट समोर आली आहे पण वांद्रे पूर्व मध्ये रिडेव्हलपमेंट वरून सुरू असलेला वाद कारणीभूत आहे का? याचा तपास सुरू आहे.