Baba Siddique Murder Case: माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील (Baba Siddique Murder Case) आरोपी प्रवीण लोणकर (Praveen Lonkar) याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. प्रवीणला रविवारी पुण्यातून अटक (Arrest) करण्यात आली होती. प्रवीण हा आरोपी शुभम लोणकरचा भाऊ आहे, ज्याने या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा हात असल्याचा दावा करत फेसबुक पोस्ट टाकली होती.
दरम्यान, प्रवीण लोणकर यांला सोमवारी वैद्यकीय तपासणीनंतर एस्प्लानेड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला रविवारी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात एकूण 6 आरोपींची ओळख पटली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे समोर आली आहेत. यामध्ये हरियाणातील गुरनैल सिंग (23), उत्तर प्रदेशमधील धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांचा समावेश आहे. गुरनेल सिंग याला अटक करण्यात आली असून त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच धर्मराज कश्यपने न्यायालयात तो अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. (हेही वाचा - Supriya Sule On Baba Siddique Murder: जर सरकारला माहित होते की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्याची सुरक्षा का वाढवण्यात आली नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल)
तथापी, न्यायालयाने पोलिसांना आरोपी धर्मराजची वय पडताळणी करून नंतर न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. तिसरा आरोपी शिवकुमार गौतम हा फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. जालंधर येथील मोहम्मद जीशान अख्तर याचीही या प्रकरणात आरोपी म्हणून ओळख पटली आहे. (हेही वाचा -Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा)
#UPDATE | Baba Siddiqui murder case | Third accused Pravin Lonkar produced before Esplanade Court after a medical checkup.
The court sent him into police custody till 21 October. https://t.co/mdJk2AXEsp
— ANI (@ANI) October 14, 2024
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे पूर्व येथे त्यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयातून परतत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीक यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या. त्यानंतर त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दोन तासांनंतर सिद्दीकी यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी मरीन लाइन्समधील बडा कब्रिस्तान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.