Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Ayodhya Case Verdict: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आज (9 नोव्हेंबर) अयोद्धा प्रकरणी निकाल दिला आहे. राम जन्मभूमी - बाबरी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर मागील 125 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता जातीय तेढ टाळण्यासाठी आणि कायदा-सुरक्षेचा प्रश्न पाहता मुंबई शहरामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे जमावबंदीचे आदेश आज सकाळी 11 वाजल्यापासून लागू करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार आहेत. सध्या मुंबईत पोलिस आणि पॅरामिलिटरी जवान तैनात करण्यात आले आहेत.मुंबईमध्ये जमावबंदी सोबतच सोशल मीडीयावरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जनतेला शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन केले आहे. Ayodhya Judgment: अयोध्या निकाल पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कलम 144 लागू; पोलिसांकडून नागरिकांना शांततेचे आवाहन

मुंबई पोलिस ट्वीट

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यासह 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज निर्णय दिला आहे. त्यानुसार, अयोद्धेतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असून तेथे मंदीर स्थापन करण्यासाठी सरकारला ट्र्स्ट स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यासोबतच मुस्लिमांसाठी अयोद्धेमध्ये 5 एकर पर्यायी जागेची व्यवस्था केली जाणार आहे. Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार.

शांतता हा आपल्या देशाचा सर्वात मोठा गुण आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की सोशल मीडियावर कोणतेही संदेश सत्यता न पडताळता फॉरवर्ड करू नये. कुठलेही अनुचित संदेश आढळल्यास १०० डायल करा. अशा प्रकारचे ट्वीट महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.