औरंगाबाद येथे शिक्षकाकडून गरिब मुलांना 20 सेकंदापर्यंत हात धुण्यासंबंधित मराठी कवितेच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृतीचा संदेश
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढील काही दिवस लॉकडाउन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नागरिकांना लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. तसेच विविध माध्यमातून कोरोना संबंधित लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याच दरम्यान आता औरंगाबाद येथील एका शिक्षकाने कोरोना व्हायरस संबंधित मराठीतून कविता बनवली आहे. ही कविता गरिब मुलांना बोलून दाखवली जात असून त्यांना 20 सेकंदापर्यंत रोज हात कसे धुवावेत आणि कोविड19 बद्दल ही जनजागृती हॉटस्पॉट ठिकाणांवर केली जात आहे.

कोरोना व्हायरसने आता पर्यंत हजारो जणांचे बळी घेतले आहेत. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसून त्यासंबंधित वैज्ञानिकांकडून शोध घेतला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला डब्लूएचओ यांनी जगातील कोरोनाचे संकट कधी जाईल सांगता येत नाही असे स्पष्ट केल्याने आता खळबळ उडाली आहे. परंतु तरीही प्रत्येक देशातील प्रशासन कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचचली जात आहे. डॉक्टर्स, पोलीस यांच्याकडून सुद्धा कोरोना व्हायरसंबंधित जनजागृती केली जात आहे.(Covid 19 च्या वाढत्या धोक्यात सुरक्षेच्या मागण्या पूर्ण न केल्यास 18 मे पासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा 'Stay at Home' चा इशारा)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी कोरोना संबंधित लागू केलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोरोनाचा वेग संथ करण्यास यश जरी आले असले तरीही साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे म्हटले आहे.