मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करत आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) जनतेसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्राची भाग्य रेषा असे या महामार्गाचे वर्णन करण्यात आले. हीच भाग्य रेषाआता या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. समृद्धी महामार्गावरील बोगद्यासमोर चक्क फिल्मी स्टाईलने हवेत गोळीबार करतानाचा एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा तरुण कोण आहे? त्याने हवेत गोळीबार नेमका का केला? त्याने खरोखरच गोळीबार केला की सोशल मीडियावर रिल्स बनविण्यासाठी त्याने हा स्टंट केला? या प्रश्नांची उत्तर अद्याप अनुत्तरीतच आहेत. पोलिसानी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केल्याचे समजते.
उद्घाटन होण्यापूर्वी आणि उद्घाटन झाल्यानंतरही समृद्धी महामार्ग जोरदार चर्चेत आहे. उद्घाटन झाल्यावर अवघ्या काही तासांमध्येच या महामार्गावरुन बैलगाड्या धावताना दिसल्या. तर कधी या महामार्गावरुन हरणेही धावताना दिसली. या घटनांची चर्चा सुरु असतानाच आता चक्क गळीबाराची घटना पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एखाद्या महामार्गावर गाडी थांबवून आणि त्यातही आपल्या हातातील बंदुकीने गोळीबार केलाच कसा जातो? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. (हेही वाचा, Watch: उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर धावल्या बैलगाड्या, व्हिडीओ व्हायरल)
व्हिडिो
समृद्धी महामार्गावर चाललंय काय? तरुणाकडून गोळीबार, व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/A57BZrYrHE
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2022
दावा केला जात आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ समृद्धी महामार्गावरील आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील हा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओत पाहायला मिळते की, हातात एक बंदूक घेऊन एक तरुण स्कॉर्पिओ गाडीसमोर उभा आहे. तो आपल्या हातातील बंदूक हवेत उंचावून बार काढताना दिसतो. तसेच, समोरून कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात कैद करत असल्याचेही जाणवते.