
Aurangabad shocker: औरंगाबाद मधील या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. वर्गाच्या बसण्याच्या बाकावरून काही शाळकरी मुलांमध्ये भांडण झालं. भांडणात मारामारी केल्याप्रकरणी एका मुलाला पोटाला गंभीर जखम झाली. त्याच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथील एका शाळेत हा प्रकरा घडून आला आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या पालकांनी चार अल्पवयीन मुलांवर तक्रार दाखल केली आहे. शाळेतील मुलांमधील हे भांडण अगदी टोकापर्यंत पोहचलं.
इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांमध्ये वर्गात बसण्याच्या बाकावरून भांडण सुरु झालं. दोलताबाद येथील देवगिरि विद्यालयातील सहावीच्या वर्गात शिकत असणारा कार्तिक गायकवाड यांच वाद वर्गातील इतर विद्यार्थ्यांसोबत सुरु झालं. मधल्या सुट्टीत कार्तिक मैदान खेळायला गेला असताना त्याला त्याचा वर्गमित्र आणि इतर वर्गातील तीन विद्यार्थी असे चार जणांनी कार्तिक गायकवाड याला गाठून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर हे चौघेही तिथून निघून गेले. मारहाण केल्याचं त्यानें घरात देखील सांगितले.
त्या दिवसापासून कार्तिकच्या पोटात दुखत असल्याचं समजलं. त्याच्या वडिलांनी त्याला दवखान्यात नेलंय त्या दिवसापासून तो शाळेतही गेला नव्हता. दवाखान्यात दाखवल्यानंतर ही त्याचं पोट दुखायचं थांबत नव्हतं.वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं तेव्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं. घाटी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी दाखल केलं. उपचारा दरम्यान 14 जुलै रोजी सांयकाळी 5च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. कार्तिकच्या घरात दुखाचं डोंगर कोसळलं. पुढे त्याच्या मृतदेहाला पोस्टमाटमसाठी पाठवलं तर त्याच्या पोटाला गंभीर जखमा झाल्याचं समजलं. त्यामळे कार्तिकच्या वडिलांनी चार मारहाण करणाऱ्या मुलांवर तक्रार दाखल केली.