Aurangabad Shocker: प्रियकराला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने केली मदत; सत्य लपवण्यासाठी लग्न लावून देण्याचा प्रयत्न
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) येथून लैंगिक अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यात एका 52 वर्षीय व्यक्तीने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ही व्यक्ती त्या मुलीसोब हे भयानक कृत्य करत होती त्यावेळी या मुलीची आईच त्या व्यक्तीला मदत करत होती. या अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी व मुलीच्या आईचा अटक करण्यात आली आहे. मुलीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही काळापूर्वी तिचे आई-वडील परस्पर मतभेदांमुळे वेगळे झाले होते.

वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर ती आणि तिचा भाऊ आईसोबत राहू लागले. या मुलीच्या आईचे आरोपीसोबत अनेक दिवसांपासून संबंध होते. ऑगस्ट 2020 मध्ये, हा आईचा प्रियकर तिच्याशी बोलण्यासाठी आईच्या घरी आला. त्याच दिवशी, या मुलीच्या भावाला त्याच्या आईने नातेवाईकाच्या घरी पाठवले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने यावेळी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा मुलीने आपल्यासोबत घडलेल्या या घृणास्पद घटनेचा निषेध केला तेव्हा तिच्या आईने तिला आरोपीचे सर्व म्हणणे मान्य करण्यास सांगितले.

या घटनेनंतर आरोपीने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. तसेच कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. आपल्यासोबत झालेला असा प्रकार सहन करून मुलीने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतरत्र राहण्याची सोय नसल्याने ती घरी परतली. त्यानंतर तिच्या आईने हा घृणास्पद गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने तिचे एका तरुणाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मुलीने चाइल्ड हेल्पलाइनशी संपर्क साधला आणि स्वतःचा जीव वाचवला. (हेही वाचा: विकृतीचा कळस ! ठाण्यामध्ये 13 वर्षीय पोटच्या मुलीवर बापानेच केला लैंगिक अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यावर घटना उघडकीस)

सध्या अल्पवयीन मुलीच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून मुलीची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. बुधवारी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.