औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत निर्णय याआधीच घेण्यात आला आहे- खासदार संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credit - PTI)

औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) करावे या मागणीसाठी एकीकडे शिवसेना आक्रमक असताना दुसरीकडे काँग्रस या नामांतराला विरोध दर्शवत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबतीत शिवसेना (Shivsena) विरुद्ध काँग्रेस (Congress) असं युद्ध रंगले आहे. तसेच अन्या काही पक्षांनी देखील या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. या सर्वाचा विचार करता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना याविषयी विचारले असता, 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे याबाबतचा निर्णय झाला आहे' असे सांगितले आहे.

मिडियाशी बोलताना संजय राऊत यांनी "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते आपल्यासाठी संभाजीनगर आहेत आणि तशीच राहतील. हा लोकांच्या भावनांचा विषय आहे, म्हणून आम्ही यावर चर्चा करू शकतो पण निर्णय घेण्यात आला आहे असे असताना देखील काँग्रेस का विरोध करत आहे. हे स्पष्ट होत नाहीए" असे सांगितले.हेदेखील वाचा- सरकारी दस्ताऐवजांवर औरंगाबादचा परस्पर संभाजीनगर उल्लेख पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जावी: बाळासाहेब थोरात

दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट करत आमचा शहरांच्या नामांतरणाला विरोध आहे असे ठाम ट्वीट केले. सीएमओ अधिकृत ट्विटर हॅन्डलवर परस्पर औरंगाबदचं नाव संभाजीनगर म्हणून करणं चूकीचं आहे. हा सरकारी दस्ताऐवजाचा एक भाग आहे. कदाचित ही अनावधानाने झालेली चूक असू शकते पण ती पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर मनसेचा संभाजीनगर नामांतराला पाठिंबा आहे. याउलट महाविकासआघाडीमध्ये एकता नसल्याने भाजपकडून जोरदार टिका होत आहे. एकूणच हे प्रकरण किती चिघळणार की थमणार हे येत्या काही दिवसांत कळेलच.