Aurangabad Mobile Blast: तरुणांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मोबाईल हाताळताना अनेकदा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना ऐकली आहे. दरम्यान एक घटना घडली आहे ज्या तरुणाच्या मोबाईल स्फोट झाला आहे. या घटनेत त्याचा पाय भाजला आहे. 11 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. क्लाससाठी तरुण घराच्या बाहेर पडताच त्याच्या सोबत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल पॅंटच्या खिश्यात होता क्षणातच त्याचा स्फोट झाला आणि या घटनेत त्याचा पाय भाजला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय तरुणाला क्लासला जाण्यासाठी मोबाईल चार्जिंग लावला होता थोड्यावेळाने चार्जिंग झाल्यावर तो मोबाईल घेऊन घरा बाहेर पडला. रस्त्यावर येताच त्याच्या मोबाईलचा भयानक आवाज येताच मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटमुळे त्याचा पाय गंभीर भाजला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असल्याचे सांगितले जात आहे. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मोबाईल स्फोटच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान बीड मध्ये ही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत सात वर्षाच्यामुलाचा तोंड भाजले आहे. मुलांना मोबाईल देणे किती धक्कादायक असू शकते, याबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली. अनिकेत सोळंके असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव होते. तर, त्याच्या तोंडाला गंभीर ईजा झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.