तिहेरी तलाकच्या नव्या कायद्यानुसार राज्यात पहिला गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

तिहेरी तलाक मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, या नवीन कायद्यानुसार औरंगाबादमध्ये आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. 20 वर्षीय तरुणीने हा गुन्हा आपला पती जावेद पठाण विरुद्ध दाखल केला आहे.

डिसेंबर 2016मध्ये जावेद आणि या तरुणीचे लग्न झाले. लग्नानंतर एक वर्षे सर्व ठीक ठक चालले होते मात्र, त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरु झाली. 9 सप्टेंबर 2018ला जावेदने आपल्या पत्नीला तिच्या नातेवाईकांकडे सोडले. त्यांनतर तप तिला न्यायला परत आलाच नाही. अचानक 23 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पती जावेदचा व्हॉट्‌सअॅपवर एक मेसेज आला. पतीने चक्क व्हॉट्‌सअॅपवरुन तिला तिहेरी तलाक दिला होता. “तुला पाच बहिणी आहेत आणि तुलाही पहिली मुलगीच झाली आहे, असे म्हणत या पतीने थेट व्हॉट्‌सअॅपवरुन तिहेरी तलाक दिला.

त्यानंतर औरंगाबादच्या वैजापूर पोलीस ठाण्यात या तरुणीने या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी नव्या कायद्यानुसार जावेद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जावेद हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 20 वर्षीय शबाना आज आपल्या एका वर्षाच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहते.