Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता सिल्लोड तालुक्यातील खुपटा गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका व्यक्तीने शेताच्या तळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. समाधान रायभान काळे (38, रा. खुपटा, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. त्याच्या खिशात मराठा आरक्षणाची मागणी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे, अशी माहिती अजिंठा पोलीस ठाण्याचे एपीआय अमोल ढाकणे यांनी दिली.

समाधानचे चुलत भाऊ गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान खूप अडचणीत होते आणि त्यांच्यावर मोठे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती आणि मातीच्या सुपीकतेच्या समस्यांमुळे त्यांना शेतीत मोठे नुकसान झाले. ते मराठा आरक्षण चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, मराठा समाजाने राज्यात अनेक आंदोलने आणि रॅली आयोजित करूनही सरकारने आरक्षण दिले नाही. (हेही वाचा: Shirdi Sai Sansthan Workers Stabbed To Death: शिर्डी दुहेरी हत्याकांड! साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने वार करून हत्या)

सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी म्हटले आहे की, ते समाजाच्या सध्याच्या परिस्थितीला कंटाळले आहेत. म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. ‘कमीतकमी, त्यांच्या मृत्यूनंतर सरकार गाढ झोपेतून जागे होईल आणि त्यांच्या समुदायाला आरक्षण मिळेल, जसे त्यांनी पत्रात नमूद केले होते,’ असे गजानन काळे म्हणाले. दुसरीकडे, फुलंब्री तालुक्यातील पाल गावातही एका 28 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सोमवारी, 3 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस अली. रवींद्र बाबुराव जाधव असे मृताचे नाव आहे.