Akola Train Accident:  अकोला रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, थोडक्यात जीव वाचला (Watch Video)
Akola Railway Accident PC Twitter

Akola Train Accident: अकोला (Akola) येथील रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवाशी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच रेल्वे पोलिसांनी धावत प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. थोडक्यात प्रवाशाचा जीव वाचला आहे. धक्कादायक म्हणजे अकोला रेल्वे स्थानकावर दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. त्यामुळे स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा- पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला)

मिळालेल्या माहितीनुसार, एका घटनेत महिल्याचा धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला. ही घटना पाहताच जवळच्या रेल्वे पोलिसांनी धाव घेत महिल्याचे महिलेचा प्राण वाचवले. तर दुसरी घटना एक प्रवाशी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेला. प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. यावेळी रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला बाहेर खेचत त्याचा जीवा वाचवला.

महिला प्रवाशीला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिसांचे नाव योगेश तांबस्कर आहे. या दोन्ही घटनाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र दोन्ही रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचे कौतुक होत आहे. एक घटना २९ एप्रिल रोजी घडली आहे. रेल्वेतून प्रवास करताना सावधगिरीने केले पाहिजे असं सांगून ही धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतात.