Shiv Sena MLA Disqualification Case Verdict | (Photo credit: archived, edited, representative image)

Shiv Sena Case Verdict: शिवसेना पक्ष मूळ कोणाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निर्णय दिला आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्राचे वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना (Shiv Sena) कोणाची हे ठरवताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सादर केलेली शिवसेना घटना मान्य केली नाही. ठाकरे यांनी सादर केलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नसल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही, असे अध्यक्ष म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही शिवसेना पक्षाच्या घटनेची एक प्रत आम्हाला प्राप्त झाली. मात्र, त्यावरही तारखेचा उल्लेख नव्हता. सन 2018 ची घटना ग्राह्य धरा हा ठाकरे गटाचा आग्रह होता मात्र, तो पूर्ण मान्य करण्यात आला, नाही. निवडणूक आयोगाने 22 जून 2023 रोजी आम्हाला दिलेली शिवसेना घटनाच आम्ही ग्राह्य धरली, असेही ते म्हणाले.

मूळ पक्ष ठरविण्याचा अधिकार मलाच- अध्यक्ष

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय देण्यापूर्वी मूळ पक्ष कोणता हे ठरविण्याच अधिकार मला आहे. त्यामुळे आगोदर मूळ पक्ष कोणता याबाबत निर्णय देणार आणि त्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगोदरच स्पष्ट केले. त्यानुसारच त्यांनी आपल्या निकालपत्राचे वाचन केले आणि निर्णय दिला. (हेही वाचा, Shiv Sena MLA Disqualification Case Verdict: एकनाथ शिंदे यांना दिलासा, उद्धव ठाकरे यांना धक्का; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल जाहीर)

निवडणूक आयोगाकडून प्राप्त शिवसेना घटना ग्राह्य धरली

शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घेताना दोन्ही गटांनी घटनेच्या वेगवेगळ्या प्रति सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही घटना विचारात आणि ग्राह्य धरण्यात आल्या नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली घटनेची प्रत ग्राह्य धरण्यात आल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांनी निकालपत्राचे वाचन केले. निवडणूक आयोग तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि सुनावणीदरम्यान जवाब नोंदवलेल्या आमदारांची साक्षही निकाला वेळी विचारात घेण्यात आली. खास करुन आमदार योगेश कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. (हेही वाचा, MLA Disqualification Case Verdict Live Streaming: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रता निकाल वाचन इथे पहा थेट (Watch Video))

उद्धव ठाकरे यांनी दिलेली घटना मान्य नाही

शिवसेना पक्षासंदर्भात निर्णय घेताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून परस्पर विरोधी याचिका आल्या होत्या. दोन्ही गटांनी आपापल्या वतीने वेगवेगळ्या घटना सादर करण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्षाच्या घटनेची एक प्रत दिली होती. मात्र, त्यावर तारखेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे पक्ष कोणाचा हे ठरविताना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचाही विचार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जी घटना दिली ती मान्य करता येणार नाही. तसेच, शिवसेनेच्या घटनेत 2018 मध्ये केलेले बदल ग्राह्य धरले गेले नाहीत. कारण ते निवडणूक आयोगासमोर आले नाही, असेही विधानसभा अध्यक्ष म्हणाले.