पुण्याच्या बोपदेव घाट (Bopdev Ghat) परिसरात मारहाण आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये कोंढवा पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना चार धारदार शस्त्रांसह अटक केली आहे. 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1:00 च्या सुमारास ट्रिनिटी कॉलेजजवळील सार्वजनिक रस्त्यावर तरुणांच्या गटामध्ये वाद सुरू झाल्याची घटना घडली. बाचाबाचीत 19 वर्षीय विश्वजीत बाबाजी हुलवळे हा तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर, हुलवाले यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या विविध कलमांखाली सशस्त्र हल्ला आणि खंडणीसह गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत अटक करण्यात आलेल्या संशयितांनी मारहाण आणि खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यांना पोलिस कोठडीत घेण्यात आले आणि पुढील तपासाअंती पोलिसांनी गुन्ह्याशी संबंधित अंदाजे ₹3,80,000 किमतीची शस्त्रे आणि वाहनं ताब्यात घेतली आहेत. या घटनेमध्ये अन्य साथीदार आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.
कोंढवा पोलिसांनी काढली परेड
Pune Police Carry Out Mass Parade of Bopdev Ghat Accused in Kondhwa!!
#PunePolice #MassParade #BopdevGhat # #AccusedParade #PoliceOperation #CrimePrevention #LawAndOrder #PuneNews #PublicSafety
(Pune Police, mass parade, Bopdev Ghat, Kondhwa, accused parade, crime… pic.twitter.com/KBHZLyYIB4
— Pune Mirror (@ThePuneMirror) January 20, 2025
भावेश बाळासाहेब कुंजीर, 23, राहणार हिवरकर मळा, सासवड, पुणे, अथर्व कैलास पवार 21, राहणार. दळवी नगर, घोरपडी, पुणे, सुरज सचिन राऊत, 21, राहणार तलाव जिल्हा सोसायटी, सासवड, पुणे, आर्यन विलास पवार, 18, राहणार दळवी नगर, घोरपडी, पुणे,सौरभ प्रदीप लोंढे, 18, राहणार धनकवडी, पुणे, राज दिगंबर रोंगे, 19, राहणार येवलेवाडी, पुणे, वरुण बबन भोसले, 21, राहणार जेजुरी, पुरंदर, पुणे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आज पोलिसांनी या गुन्हेगार्यांची परेड देखील काढली होती.