Assam Assembly Election 2021: काँग्रेसची सत्ता आली तर असम राज्यात CAA लागू होणार नाही- राहुल गांधी
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

असम विधानसभा निवडणूक 2021 (Assam Assembly Election 2021) डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस नते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सांगितले की असम राज्यात काँग्रेस (Congress ) सरकार सत्तेत आले नागरिकता (सुधारीत) कायदा (CAA) लागू होणार नाही. असम (Assam) येथील डिब्रुगड येथे राहुल गांधी यांनी सांगितले की, लोकशाही धोक्यात आली आहे. युवकांच्या हाताल काम नाही. शेतकरी आंदोलन करत आहेत. काहीही झाले तरी असम आपली संस्कृती, भाषा विसरु शकत नाही. नागपूरात निर्माण झालेली एक शक्ती संपूर्ण देशाला नियंत्रित करत आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले की, लोकशाहीचा अर्थ आहे की, अमची जनता असमवर राज्य करेन. जर आम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करु शकत नसू तर इथे लोकशाही नाही. युवकांनी सक्रिय स्वरुपात राजकारणात उतरले पाहिजे. असमसाठी, असमच्या स्वातंत्र्यासाठी पुढे यायला पाहिजे. आपल्याला दगड, लाठी, शस्त्रांनी नव्हे तर प्रेमाने लढायला हवे. राहुल गांधी यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, भाजप देशातील लोकांना दुभागण्याचे काम करते आहे.

वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी सांगितले की, जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा आम्ही असमला सुरक्षा दिली. हजारो कोट्यवधी रुपयांचे विशष पॅकेज दिले. गुंतवणुक धोरण राबवले ज्यात कोणीही असममध्ये गुंतवणूक करत असेल तर आम्ही त्यांना अनुदान देत होतो. हे सर्व भाजपच्या काळात रद्द करण्यात आले असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितले आज जनतेला विभागले जात आहे. धर्माधर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. नागरिकांचे हक्क मर्यादित केले जात आहेत. सर्वसामान्यांची संपत्ती काढून घेऊन ती उद्योगपतींना दिली जात आहे. भारत हा बहुबाषीक राष्ट्र आहे. इथे विविध भाषा आहेत. या भाषां आणि भाषांमध्ये असलेली विविधतेतील एकता हाच भारत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.