राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे शेवट काल मुंबई मध्ये शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे झाले. त्यांच्या यात्रेच्या शेवटी शिवाजी पार्कावर काल इंडिया आघाडीची सभा देखील झाली. या सभेमध्ये राहुल यांनी महाराष्ट्रातल्या एका नेत्याने, ज्याने नुकतीच काँग्रेस सोडली, ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले असं वक्तव्य केले आहे. या टीकेत त्यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही मात्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावर उत्तर देताना जर हा उल्लेख माझ्या संदर्भात केला असेल तर राहुल गांधी यांचे हे वक्तव्य हास्यास्पद आणि तर्कशुद्ध नसल्याचं म्हटलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले,'मी कॉंग्रेस सोडणार हे शेवटपर्यंत मी कुणाला सांगितलं नव्हतं. कॉंग्रेसच्या कार्यालयातून काम करत होतो. माझी सोनिया गांधींशी भेटही झालेली नाही त्यामुळे राहुल गांधींचं विधान चूकीचं आणि हास्यास्पद आहे.
पहा काय म्हणाले अशोक चव्हाण?
#WATCH | Nanded, Maharashtra: On Congress leader Rahul Gandhi's statement, BJP leader Ashok Chavan says, "He (Rahul Gandhi) has not taken any name, however, if he wants to make any remarks on me, it is illogical and baseless... It is also a lie that I have met Sonia Gandhi in… pic.twitter.com/9jWcfZCCjH
— ANI (@ANI) March 18, 2024
राहुल गांधी यांनी भाजपा विरूद्ध हल्लाबोल करताना भाजपा विरोधात लढण्याची क्षमता नसलेला एक कॉंग्रेस नेता भाजपा मध्ये गेला. माझ्या आईसमोर रडला. माझ्यात त्यांच्याविरूद्ध लढण्याची हिंमत नसल्याचं म्हणाला तसेच तुरूंगात जाण्याची भीती असल्याने हे भाजपात गेल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. शिवसेना, एनसीपीतील नेते असेच भाजपमध्ये गेले नाहीत. मी ज्या शक्तीचा उल्लेख करत आहे त्या शक्तीने या नेत्यांचा गळा पकडून त्यांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे हे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत. नक्की वाचा: Rahul Gandhi: 'ईव्हीएमशिवाय पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत, यावेळी मशीनवर लक्ष ठेवा', राहुल गांधींचा निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा .
अशोक चव्हाण हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे बडे नेते होते. त्यांच्या घरात राजकारणाचा वारसा आहे. वडील शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनाही कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. मात्र फेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देत दुसऱ्याच दिवशी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपात पक्ष प्रवेश होताचा त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे.