महाविकास आघाडी काही खटके उडत असल्याने मुख्यमंत्र्यांशी लवकरच करणार याबाबत चर्चा- अशोक चव्हाण
Ashok Chavan | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूवर मात करुन नुकतेच घरी परतलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. महाविकासआघाडीतील हे नेते असून सध्या राजकीय वर्तुळात या महाविकास आघाडीत खटके उडत असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भाष्य करत अशोक चव्हाणांनी महाविकास आघाडीत मतभेद असून याबाबात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. हे दूर होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट होणो अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरस सारख्या आपत्ती सर्व स्तरांतून राज्य सरकारला पाठिंबा मिळत आहे. मात्र या सरकारच्या महाविकासआघाडीतच नेत्यांमध्ये खटके उडत आल्याची चर्चा अनेकदा कानावर येत आहे. त्यातच आता राज्याचे विद्यमान बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यावर भाष्य करत या चर्चांना दुजोरा दिलाी आहे. Ashok Chavan Recovers From COVID19: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन

दरम्यान, अशोक चव्हाण हे विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबईला गेले होते. याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. या निवडणुकीनंतर नांदेडला गेल्यानंतर ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळे ठेवले होते. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रिपोर्टनंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. याआधी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनीही कोरोनावर मात केली.